पुणे,दि.१४ एप्रिल,(ऑनलाईन प्रतिनिधी) – राज्यात कडकडाटासह अवकाळी पाऊस पडण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. अवकाळी पावसांमुळे राज्यातील अनेक जिल्ह्यांना फटका बसला आहे. अशामध्ये राज्यातील शेतकऱ्यांची चिंता आणखी वाढली आहे.
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, आज कोकणसह मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात काही भागांमध्ये गारपीट होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. तसेच, राज्यातील अनेक जिल्ह्यांना 13 ते 14 एप्रिल रोजी यलो अलर्ट देण्यात आला आहे.
राज्यात सध्या ऊन- पावसाचा खेळ सुरु आहे. पण बुधवारी रात्री मुंबईच्या अनेक भागांमध्ये विजांच्या कडकडाटासह अवकाळी पावसाने हजेरी लावली.
हवामान विभागाने राज्यातील काही जिल्ह्यांना गारपिटीचा इशारा दिला आहे. मध्य महाराष्ट्रातील पुणे, सातारा, कोल्हापूर, नाशिक, अहमदनगर, धुळे आणि नंदुरबार या जिल्ह्यात देखील गारपिटीची शक्यता आहे. त्यामुळे या भागातील शेतकऱ्यांनी आणि नागरिकांनी काळजी घ्यावी.
राज्यात अवकाळी पाऊस आणि गारपिटीचा इशारा, ‘या’ जिल्ह्यांना यलो अलर्ट
RELATED ARTICLES
Recent Comments
Hello world!
on