अहमदनगर,दि.८ एप्रिल,(प्रतिनिधी) – गुड फ्रायडे निमित्त ह्युम मेमोरियल चर्चमध्ये प्रार्थनेसाठी ख्रिस्ती बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. या प्रार्थनेच्या अध्यक्षस्थान चर्चे मुख्य धर्मगुरू पी.जी. मकासरे होते, या भक्तीचे संचलन सहा. धर्मगुरू रेव्ह. विद्यासागर भोसले यांनी केले. मुंबई येथील रेव्ह. सागर केदारी यांनी या विशेष भक्ती मध्ये येशू ख्रिस्ताने कृसावरून जे महत्त्वाचे सात वाक्य म्हटले त्याचे महत्त्व आणि सत्यता सांगितली येशू ख्रिस्त निष्पाप व निर्दोष असतानाही काही अधिकाऱ्यांनी त्याला दोषी ठरवले कारण ते अधिकारी त्यांच्या सत्यतेतला त्यांच्या सामर्थ्याला आणि त्यांच्या देवपणाला घाबरत होते असे असतानाही येशू ख्रिस्ताने अखिल मानव जातीसाठी व त्यांच्या पापक्षमे साठी आपले स्वतःचे बलिदान देऊन स्वर्गाचा मार्ग नैतिकतेने जगणाऱ्या सर्व मानवासाठी मोकळा केला आहे. देवाने मानवावर असलेल्या प्रीती खातर हे बलिदान दिले आहे कारण देव प्रीती आहे म्हणून आपणही एकमेकांवर प्रीती करावी कारण प्रीती पापाची रास झाकते आज जगाला व देशाची साम्राज्याची नव्हे तर प्रीतीची गरज आहे असे त्यांनी प्रबोधन केले.
यावेळी मंडळीचे सहसचिव मिलिंद भिंगारदिवे यांनी प्रमुख पाहुण्यांचे स्वागत करीत त्यांचा परिचय करून दिला सभासदांची बैठक व्यवस्था व एकंदरीत भक्तीचे आयोजन चर्चे सेक्रेटरी जॉन्सन शेक्सपियर समवेत कार्यकारी सदस्य एन.बी.जाधव, संतोष जाधव, वसंत कांबळे, जितेंद्र पाडळे, महेंद्र भोसले, विजय अंधारे, अनिल अंधारे, फ्रँकलिन शेक्सपियर, अल्विन शेक्सपियर, निशा कदम, सुषमा उजागरे, सचिन जाधव, श्याम भिंगारदिवे आदीसह समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते