अहमदनगर,दि.६ एप्रिल,(प्रतिनिधी) – महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३२ व्या जयंतीनिमित्त शहराचे आमदार संग्राम जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली सामाजिक न्याय विभाग राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी मार्फत भव्य भिम महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. सदर कार्यक्रमाची रूपरेषा खालील प्रमाणे आहे की, दि ८ एप्रिल २०२३ रोजी सायंकाळी ५.३० वाजता पाजरपोळ मैदान डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक मार्केटयार्ड येथे संगीत कार्यक्रम सादरकर्ते महाराष्ट्राच्या प्रसिद्ध गायिका कडूबाई खरात यांचा होणार आहे.
दिनांक १३ एप्रिल २०२३ रोजी सायंकाळी ६ वाजता माळीवाडा येथे नगर स्टार नृत्य स्पर्धा होणार आहे तसेच १४ एप्रिल २०२३ रोजी सायंकाळी ५.३० वाजता भव्य मिरवणूक निघणार असून जिल्हाभरातील तमाम नागरिकांनी कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन पत्रकार परिषदेद्वारे करण्यात आले. यावेळी आयोजक राष्ट्रवादीचे सामाजिक न्याय विभाग शहर जिल्हाध्यक्ष सुरेश बनसोडे, अंकुश मोहिते, सिद्धार्थ आढाव, विशाल भिंगारदिवे, पप्पू पाटील, समीर भिंगारदिवे, बाली बांगरे, सृजन भिंगारदिवे, महेश आठवले, निखिल कोल्हे, सतीश शिरसाठ, येसुदास वाघमारे, सतीश साळवे, श्रीकांत भोसले, जय कदम, सुरज जाधव आदीसह पदाधिकारी उपस्थित होते.