अहमदनगर,दि.५ मार्च,(प्रतिनिधी) – प्रयास व नम्रता दादी-नानी ग्रुपच्या वतीने महिला दिन मार्केटयार्डमध्ये मात्रा गोळा करणार्या वंचित महिलांसमवेत साजरा करण्यात आल्या. मात्रा गोळा करुन पोटाची खळगी भरणार्या महिलांना साड्यांची भेट मिळाल्याने त्यांच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळले. महिला दिन काय असते ? याची पहिल्यांदाच अनुभूती आल्याची भावना मात्रा गोळा करणार्या महिलांनी व्यक्त केली.
तर महिलांनी एकमेकींवर फुलांचा वर्षाव करुन होळीचा आनंद लुटला. महिला दिन फक्त सेलिब्रेशनने साजरा न करता, वंचित घटकातील महिलांच्या जीवनात आनंद निर्माण करण्याच्या भावनेने हा उपक्रम राबविण्यात आला होता. या कार्यक्रमासाठी नगरसेविका नीता अविनाश घुले, रूपाली भनभने, सुनिल भनभने, प्रिया आठरे, विद्या बडवे, मेघना मुनोत, अनिता काळे, साधना भळगट, छाया राजपूत, सविता गांधी, ग्रुपच्या अध्यक्षा अलकाताई मंदडा, स्वाती गुंदेचा, उषा सोनी, पूजा चव्हाण, ज्योती कानडे, जयश्री पुरोहित, शकुंतला जाधव, हिरा शहापुरे, आशा गायकवाड, सुजाता पुजारी, उज्वला बोगावत, शोभा पोखरणा, दीप्ती मुंदडा आदींसह महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
नीता घुले म्हणाल्या की, दुर्बल व वंचित घटकातील महिलांना आपल्या आनंदात समावून घेण्याच उपक्रम प्रेरणादायी आहे. महिलांनी महिलांना आधार दिल्यास अनेक प्रश्न सुटणार असल्याचे त्यांनी सांगितले. रुपाली भनभने यांनी वर्षभर प्रयास व नम्रता दादी-नानी ग्रुप महिलांसाठी विविध उपक्रम राबवित आहे. महिलांच्या सर्वांगीन विकास व आरोग्याबरोबर जीवनात आनंद निर्माण करण्यात आला असल्याचे त्यांनी सांगितले.
प्रास्ताविकात विद्या बडवे यांनी मागील पंचवीस वर्षापासून महिलांसाठी प्रयास ग्रुप कार्य करीत आहे. एका दिवसापुरता महिला दिन साजरा न करता, वर्षभर महिलांसाठी या ग्रुपच्या माध्यमातून विविध उपक्रम राबविले जातात. महिलांच्या सक्षमीकरणाच्या उद्देशान त्यांना प्रोत्साहन देऊन, त्यांच्या कलागुणांना वाव दिला जात असल्याचे स्पष्ट केले.
सावित्रीबाई फुले यांच्या वेशभुषेत कार्यक्रमात अवतरलेल्या संस्कृती वाघस्कर या विद्यार्थीनीने शिक्षणाचे महत्त्व सांगून स्त्री शक्तीचा जागर केला. महाराष्ट्र गौरव पुरस्कार मिळाल्याबद्दल आरती लड्डा यांचा ग्रुपच्या वतीने सत्कार करण्यात आला. यावेळी महिलांसाठी विविध मनोरंजनात्मक व बौध्दिक खेळाच्या स्पर्धा घेण्यात आल्या. विजेत्या महिलांना उपस्थित पाहुण्यांच्या हस्ते बक्षिसे देण्यात आली. या कार्यक्रमात मात्रा गोळा करणार्या महिलांना नगरसेविका नीता अविनाश घुले यांच्या वतीने नऊवारी साड्या देण्यात आल्या. या कार्यक्रमास श्रीमान दालनाचे सहकार्य लाभले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पूजा बलदोटा यांनी केले. आभार अलकाताई मुंदडा यांनी मानले.