मुंबई, एंटरटेनमेंट, २ मार्च २०२३ –
‘पुष्पा’ चित्रपट दाक्षिणात्य सिनेसृष्टीत तुफान गाजला होता. ‘झुकेगा नही साला’ म्हणणारा पुष्पा पुष्पाने बॉक्स ऑफिसवर चांगलीच गरुडझेप घेतली. पुष्पा सिनेमामुळे अल्लू अर्जुनने स्वतःची एक वेगळी ओळख प्रस्थापित केली आहे. आता अल्लू अर्जुनच्या ‘पुष्पा २’ सिनेमाची सर्वांना उत्सुकता आहे.
‘पुष्पा २’ कधी भेटीला येणार याची आतुरता सगळ्यांना आहे. तर त्याचे उत्तर म्हणजे अल्लू अर्जुनचा वाढदिवस. अल्लू अर्जुन यंदा स्वतःचा वाढदिवस मोठा दणक्यात साजरा करणार आहे. स्वतःच्या वाढदिवसालाच अल्लू अर्जुन ‘पुष्पा २’ ची पहिली झलक प्रेक्षकांसमोर आणणार आहे. ८ एप्रिलला अल्लू अर्जुनचा वाढदिवस असतो. स्वतःच्या वाढदिवशी अल्लू अर्जुन ‘पुष्पा २’ चा टिझर अथवा सिनेमाचं पोस्टर प्रदर्शित करणार अशी चर्चा आहे.
पहिल्या भागाप्रमाणे दुसऱ्या भागातही समंथा दिसणार अशी प्रचंड चर्चा होती. पण समंथाने ‘पुष्पा २’ मध्ये काम करण्यास स्पष्ट नकार दिलाय. चाहत्यांना वाटलं होतं की, समंथाची सध्याची लोकप्रियता बघता मानधनामुळे काही समस्या निर्माण झाली आहे का? पण असं नाही. पैशांपेक्षा तत्व मोठी या मतावर ठाम राहत एका वेगळ्याच कारणामुळे समंथाने ‘पुष्पा २’ मध्ये काम करण्यास नकार दिला आहे.
‘पुष्पा २’ मध्ये पुष्पा आणि भंवर सिंग (फहद फासिल) यांच्यातील संघर्ष सुरूच राहील. रश्मिका मंदान्ना मुख्य भूमिकेत आहे. विजाग, विशाखापट्टणम येथे 10 दिवसांचे शूट शेड्यूल पूर्ण केल्यानंतर अल्लू अर्जुन सध्या चित्रपटासाठी हैदराबादमध्ये शूटिंग करत आहे.