अहमदनगर,दि.२६ फेब्रुवारी,(प्रतिनिधी) – युवा किर्तनकार अतुल महाराज भुजाडी यांची अखिल विश्व वारकरी परिषदेच्या (महाराष्ट्र राज्य) राहुरी तालुकाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. जिल्हा कार्याध्यक्ष विजय भालसिंग यांनी भुजाडी यांच्या नियुक्तीची घोषणा करुन त्यांना नियुक्तीपत्र देऊन त्यांचा सत्कार केला.
अतुल महाराज भुजाडी हे जिल्ह्यातील युवा किर्तनकार असून, ग्रामीण भागात वारकरी सांप्रदायाच्या माध्यमातून धार्मिक व सामाजिक कार्य करत आहे. मुसळवाडी (ता. राहुरी) हे त्यांचे मुळगाव असून, त्यांनी श्री ज्ञानेश मिशन संस्था सिध्द बेट आळंदी या ठिकाणी किर्तनाचे (संगीत, गायन) धडे घेतले आहेत. किर्तनातून ते विविध सामाजिक विषयांवर जनजागृती करुन तरुण पिढीला व्यसनमुक्ती, हुंडाबंदी व पर्यावरण प्रश्नावर समाजप्रबोधन करत आहे.
युवा किर्तनकार भुजाडी युवकांमध्ये जागृती करुन त्यांना दिशा देण्याचे कार्य करत आहे. त्यांच्या सामाजिक व धार्मिक कार्याची दखल घेऊन त्यांना अखिल विश्व वारकरी परिषदेच्या राहुरी तालुकाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली असल्याची माहिती जिल्हा कार्याध्यक्ष विजय भालसिंग यांनी दिली.
युवकांच्या माध्यमातून देशाची प्रगती होणार असून, यासाठी सक्षम व सशक्त युवक घडविण्यासाठी अखिल विश्व वारकरी परिषदेच्या माध्यमातून कार्य करणार असल्याचा संकल्प भुजाडी यांनी व्यक्त केला. या निवडीबद्दल त्यांचे अखिल विश्व वारकरी परिषदेचे प्रदेशाध्यक्ष नितीन सातपुते, जिल्हाध्यक्ष साहेबराव पाचारणे, जिल्हा सचिव कीर्तनकार दिलीप महाराज साळवे, जिल्हा उपाध्यक्ष जालिंदर उल्हारे, शहराध्यक्ष अॅड. सुनील महाराज तोडकर, नगर तालुका अध्यक्ष घनश्याम म्हस्के, जामखेड तालुका अध्यक्ष भीमराव मुरूमकर, शहर कार्याध्यक्ष महेश कांबळे, महिला तालुका अध्यक्षा प्रतिभा साबळे यांनी अभिनंदन करुन पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या.