दररोज 300 कि.मी.चे अंतर करणार पूर्ण
अहमदनगर,दि.२६ फेब्रुवारी,(प्रतिनिधी) – आंतरराष्ट्रीय सायकलपटू व 2022 वर्षात दोन वेळा डबल एस.आर. चा मान पटकाविणारा जस्मितसिंह वधवा याने यावर्षीच्या काश्मीर ते कन्याकुमारी 3 हजार 700 कि.मी. च्या सायकल राईडला शनिवारी (दि.25 फेब्रुवारी) श्रीनगरच्या लाल चौकातून प्रारंभ केले. 14 दिवसात वधवा ही सायकल राईड पूर्ण करुन कन्याकुमारीचा अंतिम टप्पा गाठणार आहेत.
या राईडद्वारे निधीचे संकलन करुन घर घर लंगर सेवेच्या माध्यमातून किमान शंभर गरजू मुलींना सायकल उपलब्ध करुन देण्याचा संकल्प वधवा यांनी व्यक्त केला आहे. वर्ल्ड अल्ट्रा सायकलिंग असोसिएशनच्या मान्यतेने दिल्ली रेन्डोनियर्सच्या वतीने ही डॉ. चिरो मित्रो यांच्या मार्गदर्शनाखाली होत आहे. यामध्ये देशभरातील तब्बल बारा तर एक सायकलपटू विदेशातून सहभागी झाला आहे.
श्रीनगरमध्ये 0 अंश डिग्रीच्या नीचांक तापमान पासून सुरु झालेली सायकल राईड विविध टप्पे पार करुन कन्याकुमारी येथे 45 अंश डिग्रीच्या तापमानात पोहचणार आहे. शारीरिक क्षमतेचा कस लावत सायकलपटू ही सायकल राईड पूर्ण करणार असून, यामध्ये श्रीनगर ते कन्याकुमारी पर्यंत पोहचूस्तर सायकलपटूंची त्वचा जळण्याची देखील शक्यता आहे. यामध्ये ते दररोज 300 कि.मी.चा प्रवास करणार आहेत.
सामाजिक निधी उभारण्यासाठी जस्मितसिंह वधवा यांनी घर घर लंगर सेवा व आय लव्ह नगरशी भागिदारी केलेली आहे. ग्रामीण भागात मुली शिक्षणासाठी रोज 5 ते 10 किलोमीटरवर असलेल्या शाळेत पायपीट करुन जातात.
त्यांना सायकल उपलब्ध होण्याच्या उद्देशाने या राईडच्या माध्यमातून निधी उपलब्ध करण्याचे काम सुरु आहे. संपूर्ण सायकलिंग राईड आणि इतर खर्च 5 लाख असून, वधवा स्वत: हा खर्च पेलवत आहे. या राईडच्या माध्यमातून जमा झालेली रक्कम लंगर सेवेच्या माध्यमातून ग्रामीण भागातील किमान शंभर मुलींच्या सायकलीसाठी वापरली जाणार आहे.
या राईडला समर्थन देऊन गरजू मुलींच्या सायकलसाठी देणगी देण्याकरिता हरजितसिंह वधवा, प्रितपालसिंह धुप्पड, जनक आहुजा, सतीश गंभीर, राहुल बजाज, प्रशांत मुनोत, राजेंद्र कांत्रोड, गुलशन कंत्रोड, दलजीतसिंह वधवा, कैलाश नवलानी, राजा नारंग, अजय पंजाबी, राजू जग्गी, डॉ. संजय असनाणी, सुनील थोरात, सुनील छाजेड, विपुल शाह, शरद बेरड, प्रमोद पंतम, किशोर मुनोत, करण धुप्पड यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन घर घर लंगर सेवेच्या वतीने करण्यात आले आहे.
सायकलपटूची 24 तासातून अवघी चार दोन ते चार तास विश्रांती
जस्मितसिंह वधवा याने मागच्या वर्षी 1 हजार, 600 व 400 कि.मी. चे प्रत्येकी दोन राऊंड तर 300 व 200 कि.मी. चे प्रत्येकी तीन राऊड पूर्ण केले आहेत. सुपर रायडिंग मध्ये सहभागी होऊन त्यांनी दिवस रात्र सायकल देखील चालवली आहे. 24 तास मध्ये ते फक्त दोन ते चार तास विश्रांती करुन पुन्हा सायकल राईडसाठी सज्ज राहणार आहेत.
अपघातामध्ये वाचून अडीच महिन्यात पुन्हा काश्मीर ते कन्याकुमारी सायकल राईडसाठी वधवा सज्ज
दिल्ली जवळील फरिदाबाद पलवल टोलनाक्याजवळ नुकतेच झालेल्या अपघातामध्ये जस्मितसिंह वधवा थोडक्यात बचावले. मागून सुसाट वेगाने आलेल्या कंटेनरने त्याला धडक दिली. दैव होते बलवत्तर म्हणून किरकोळ फ्रॅक्चर होऊन त्याचे प्राण वाचले, या घटनेत सायकलचा पूर्णत: चेंदामेंदा झाला होता. या अपघातात मणक्याला छोटे फ्रॅक्चर असताना अडीच महिन्यात वधवा यांनी पुन्हा स्वत:ला काश्मीर ते कन्याकुमारी सायकल राईडसाठी सज्ज केले आहे.
- जिल्हाधिकारी कार्यालयात भारतातील सर्वात मोठा स्वीप कक्ष पाहण्यासाठी नागरिकांना आवाहन
- नगरमध्ये महाविकास आघाडीची ताकद दाखवणारी रॅली: अभिषेक कळमकर यांच्या प्रचाराला जनतेचा पाठिंबा
- अहिल्याबाईचे वंशज प्रा. राम शिंदे यांना प्रचंड मताने विजयी करा – ज्योतिरादित्य शिंदे
- दिवाळी सामाजिक जाणिवेने साजरी करा – सौ. वीणा बोज्जा
- महाराष्ट्र विधानसभेसाठी भाजपची 99 उमेदवारांची पहिली यादी जाहीर