बोल्हेगाव येथील किड्स सेकंड होम स्कुल मध्ये छत्रपती शिवाजी महाराज जयंती साजरी
अहमदनगर,दि.२१ फेब्रुवारी,(प्रतिनिधी) – विश्व निर्मल फौंडेशन संचलित किड्स सेकंड होम प्री प्रायमरी स्कुल मध्ये छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त विद्यार्थ्यांकडून वक्तृत्व स्पर्धा घेण्यात आली. या वेळी बोलतांना शाळेचे कोषाध्यक्ष व व्यवस्थापक संदीप गांगर्डे म्हणाले आज शिवाजी महाराजाची जयंती आहे व हा दिवस म्हणजे आपल्या हिंदुस्थानला स्वराज्य देण्याचे मोठे कार्य महाराजांनी केले असल्यामुळे महाराजांची शिकवण आत्मसात करणे काळाची गरज आहे.
या वेळी वक्तृत्व स्पर्धे मध्ये मोठया प्रमाणात विदर्थ्यांनी सहभाग घेऊन छत्रपती शिवाजी महाराजांचे बालपणापासून ते स्वराज्य मिळणे पर्यंतच्या अनेक घटनाचा उल्लेख केला. यावेळी विदयार्थी व विदयार्थ्यांचे पालक तसेच परिसरातील नागरिक मोठया प्रमाणात उवस्थित होते. सुरुवातीस छत्रपती शिवाजी महाराज यांचे पुतळ्यास पुष्प अर्पण करून दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.
कार्यक्रमाचे स्वागत लक्ष्मीकांत पारगावकर यांनी मानले तर आभार प्रदर्शन चंद्रकांत रोहकले यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी संस्थेचे कोषध्यक्ष संदीप गांगड्रे,प्रिन्सिपल सौ. दीपिका कदम, सौ. आचल नेटके, सौ. संगीता गांगर्डे, रुपाली जोशी, वैशाली नजन, राणी उगले, शुभम भालदंड व प्रवीण वाघमारे यांनी परिश्रम घेतले.