सहजयोग ध्यान केल्यामुळे विदयार्थ्यांची व्यक्तिमत्व विकास घडतो -प्राचार्य खर्डे
अहमदनगर,दि.१९ फेब्रुवारी,(प्रतिनिधी) – अहमदनगर जिल्हा सहजयोग परिवारच्या वतीने श्री छत्रपती शिवाजी महाराज अभियांत्रिकी महाविद्यालय मधील विदयार्थ्यांसाठी सहजयोग ध्यान साधनेचे कार्यक्रम पार पडले या वेळी महाविद्यालयाचे प्राचार्य वाय आर खर्डे म्हणाले, महाराष्ट्र शासनाच्या शैक्षणिक विभागाने सहजयोग ध्यान विदयार्थ्यांना घेण्याचे सूचना केल्यात त्या प्रमाणे आज या ध्यान साधनेची प्रचिती आमच्यासह सर्व विदयार्थ्यांनाही आली आहे. सहजयोग ध्यान केल्यामुळे विदयार्थ्यांची व्यक्तिमत्व विकास घडतो व मुलांच्या सुप्तगुणांना वाव मिळतो.
यावेळी अहमदनगर जिल्हा सहजयोग समन्व्यक श्रीनिवास बोज्जा यांनी विदयार्थ्यांना सहजयोग ध्यान केल्यामुळे काय काय फायदे होतात या बाबत माहिती दिली. मेजर कुंडलिक ढाकणे यांनी सहजयोगाची माहिती सांगून त्याची प. पु. माताजी श्री निर्मला देवी यांच्या परमकृपेत प्रचिती दिली. युवाशक्ती पूर्वजा बोज्जा हिने सहजयोग ध्यान साधनेमुळे जो अनुभव आला ते सांगितले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. ए.जी देखणे यांनी केले. स्वागत प्रा.जी एस पाटील यांनी केले तर आभार प्रा.पी जी निकम यांनी मानले. या कार्यक्रमास महाविद्यालयाचे प्रा. काळे, प्रा. वाळके व प्रा. सिसोदिया, यांचे विशेष सहकार्य लाभले. कार्यक्रम यशस्वी होणे साठी सहजयोगी शहर समन्वयक लक्ष्मण अंदे,राहुल सातपुते, रवी आगरकर, मेजर दांगडे,सौ. दांगडे, डाके साहेब, गीता सातपुते, गणेश कोडम, श्याम सुद्रिक, अविनाश आडेप, वैष्णवी रच्चा, गजेंद्र सांगळे आदीचे सहकार्य मिळाले.