Homeनगर शहरपोस्टल संघटनेचे द्विवार्षिक अधिवेशन संपन्न

पोस्टल संघटनेचे द्विवार्षिक अधिवेशन संपन्न

अहमदनगर,दि.१३ फेब्रुवारी,(प्रतिनिधी) – टपाल कर्मचाऱ्याचे अनेक प्रश्न प्रलंबितअसून संघटनेच्या माध्यमातून पाठपुरावा केला जात आहे. संघटना असेल तर कामगारांचे अस्तित्व टिकेल असे प्रतिपादन नॅशनल असोसिएशन ऑफ पोस्टल एम्प्लॉईजचे राज्यसचिव सुनिल झुंजारराव यांनी केले. संघटनेचे अहमदनगर विभागीय अधिवेशन राज पॅलेस येथे संपन्न झाले त्यावेळी ते बोलत होते. यावेळी संतोष यादव, रामभाऊ लांडगे, नामदेव डेंगळे, सागर आढाव, एकनाथ ताकपेरे, सेवानिवृत्त प्रवर अधिक्षक वाय.पी.साळवे, के. एम. कुमठेकर, संदिप सैदाणी आदी उपस्थित होते.

अधिवेशनास प्रारंभ सौ वंदना नगरकर यांच्या गणेशवंदनने तर मान्यवरांच्या हस्ते दिपप्रज्वलन करून झाली. अहमदनगर विभागाचे संघटनेचे नेते संतोष यादव यांनी आपल्या मनोगतात विभागातील सर्व समस्यावर सविस्तरपणे प्रकाश टाकला. सध्य परिस्थितीत टपाल विभागातील सर्व योजनेस नागरिकांकडून भरघोस प्रतिसाद मिळत आहे. टपाल विभागातील बदलती संगणकीय कार्यप्रणालीमध्ये सातत्याने पुरेसे नेटवर्क उपलब्ध होत नसल्याने सिस्टीममध्ये सातत्याने समस्या येत आहेत. त्यामुळे ग्राहकास नाहक त्रासास सामोरे जावे लागते. परिणामी ग्राहकाच्या रोषास आम्हास सामोरे जावे लागते. त्यामुळे सिस्टीममध्ये आवश्यक नेटवर्क उपलब्ध करून द्यावे, जेणेकरून आम्हास ग्राहकास तात्काळ सेवा देण्यास प्राधान्य देता येईल. तरी याविषयी संघटनेने वरिष्ठ पातळीवरून मार्ग काढणेकरिता प्रयत्न करावा अशी विनंती केली.

रामभाऊ लांडगे म्हणाले की, आता आभासी जगात संवादाची माध्यमे उपलब्ध असल्याने, आता सभासदाच्या प्रत्यक्ष संवाद होत नाही. पूर्वीप्रमाणेच निदान आठवड्यात एकत्र येत आपल्या समस्यांवर प्रत्यक्ष भेटून चर्चा करत त्यातून निश्चित अनेक बाबीवर मार्ग निघतो. याप्रसंगी वाय पी साळवे, के एम कुमठेकर, सागर कलगुंडे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. या अधिवेशनात संघटनेचे पुढील दोन वर्षाकरिता कार्यकारणी निवडण्यात आली.

संघटनेच्या अध्यक्षपदी संतोष यादव, कार्याध्यक्षपदी रावसाहेब चौधरी, उपाध्यक्षपदी संदिप कोकाटे, बापूसाहेब तांबे, विभागीय सचिवपदी सागर कलगुंडे तर खजिनदार पदी श्रीमती मोनाली हिंगे तर सहाय्यक सचिवपदी श्रीमती वासंती नगरकर, प्रियांका भोपळे, श्रीमती पूजा सिन्नरकर, कमलेश मिरगणे, प्रदिप सूर्यवंशी यांची तर पोस्टमन संघटनेच्या अध्यक्षपदी नामदेवराव डेंगळे तर विभागीय सचिव म्हणून सुनिल थोरात यांची पुढील दोन वर्षासाठी निवड करण्यात आली. याप्रसंगी राजेंद्र विश्वास, शिवाजी चाफे, श्रीमती निलिमा कुलकर्णी, श्रीमती ज्योती गटणे, के बी शिरसाठ, श्रीकांत चौधरी यांचे सह अहमदनगर विभागातील संघटनेचे सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नामदेव डेंगळे हे होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक संदिप कोकाटे, आभार सुनील थोरात तर सूत्रसंचालन बापू तांबे यांनी केले.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!