मुंबई,दि.११ फेब्रुवारी,(ऑनलाईन प्रतिनिधी) – देवेंद्र फडणवीस यांनी आज उद्धव ठाकरे यांच्यावर चांगलाच निशाणा साधला आहे. राज्यातील शिंदे-फडणवीस सरकार हे विशेष परिस्थितीमध्ये तयार झालेले आहे. हे गद्दारांचे नाही, खुद्दारांचे सरकार आहे. गद्दारांचे सरकार तर ते होते जे २०१९ साली जनतेने दिलेल्या मताचा अवमान करून पाठीत खंजीर खुपसून स्थापन झाले आहे. त्या गद्दारांच्या सरकारमधून खुद्दार बाहेर पडले आणि गद्दार खाली पडले, असं म्हणत देवेंद्र फडणवीस म्हणाले आहे.
नाशिक ही भूमी निवृत्तीनाथाची भूमी आहे. भाजपने याच भूमीत ‘शत-प्रतिशत’चा नारा दिला होता तीच ही भूमी आहे. आपण दिलेल्या नाऱ्यामुळे महाराष्ट्रात पहिला पक्ष भाजप आहे हे आपण दाखवून दिले आहे. मला काय मिळणार हे येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकांपर्यंत सोडून द्या. पदे मिळतील पदे मिळणार नाही. पण सध्या काम करा. त्यानंतर जनता आपल्याला पुन्हा एकदा संधी देईल’, असं देवेंद्र फडणवीस यावेळी म्हणाले आहे.
महाराष्ट्राचे मागील अडीच वर्ष वाया गेले. अडीच वर्ष मागच्या सरकारमध्ये काहींनी घरे भरण्याचे कामे केले. मात्र, आता राज्यातील शिंदे-फडणवीस सरकार हे जनतेचे सरकार आहे.
हे गद्दारांचे नाही, खुद्दारांचे सरकार आहे. जनतेचा विश्वासघात करुन महाविकास आघाडीचे सरकार अस्तित्वात आले आहे. हे सरकार आपला कार्यकाळ पूर्ण करेच, पण पुन्हा दीडपट संख्या घेऊन परत येऊ. ज्यांना अहंकार होता त्यांना २०१४ मध्ये धडा शिकवला, असा टोलाही फडणवीसांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांना लगावला आहे.
आम्ही २०-२० ची मॅच सुरु केली आहे, २०२४ ला एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली मॅच जिंकणार. आता फक्त जनतेसाठी काम करायचे, मला काय मिळेल याचा विचार करायचा नाही. असा महत्त्वाचा सल्लाही फडणवीसांनी भाजप नेते-पदाधिकाऱ्यांना दिला आहे. मात्र जे मला जेलमध्ये पाठवण्याचे प्रयत्न करत होते. तेच तुरुंगात गेले आहे. मी यांच्या बापालाही घाबरत नाही. असे देवेंद्र फडणवीस यांनी खडसावून सांगितले आहे.
हे गद्दारांचं नाही तर खुद्दारांचं सरकार; देवेंद्र फडणवीस यांची उद्धव ठाकरेंवर टीका
RELATED ARTICLES
Recent Comments
Hello world!
on