मुंबई,६ फेब्रुवारी,(ऑनलाईन प्रतिनिधी) – शिवसेनेचं धनुष्यबाण चिन्ह कोणाचं? शिवसेना कोणाची यावरून उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे गटात वाद सुरू आहे. धनुष्यबाण चिन्हाचं भवितव्य सुप्रीम कोर्टाच्या सुनाणवीनंतर ठरणार आहे. त्यामुळे केंद्रीय निवडणूक आयोग आताच निकाल देणार नाही. सुप्रीम कोर्टाच्या सुनावणीनंतर आयोग निकाल देणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी १० फेब्रुवारीला मुंबई दौऱ्यावर येणार आहे. त्याआधी निवडणूक आयोग शिवसेनेबाबत निर्णय देण्याची शक्यता वर्तवण्यात येत होती. मात्र, केंद्रीय निवडणूक आयोग आत्ताच निकाल देणार नाही. सुप्रीम कोर्टाच्या सुनावणीनंतर केंद्रीय निवडणूक आयोग निकाल देण्याची शक्यता आहे.
शिवसेना आणि धनुष्यबाण कोणाचा? यावरील सुनावणी सुप्रीम कोर्टात १४ फेब्रुवारीपासून होणार आहे. अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. सुप्रीम कोर्टाच्या निकालापूर्वी निवडणूक आयोगाने निकाल देऊ नये, असा उद्धव ठाकरे यांचे वकील कपिल सिब्बल यांनी मुद्दा मांडला होता.
या प्रकरणावर निवडणूक आयोगाच काम आता अंतिम टप्प्यात आले आहे.मात्र, धनुष्यबाण चिन्हाबाबत सुप्रीम कोर्टात १४ फेब्रुवारी सुनावणी झाल्यानंतर निवडणूक आयोग त्यांचा निकाल जाहीर करण्याची शक्यता आहे.
महाराष्ट्रातील दोन जागेसाठी कसबा आणि पिंपरी चिंचवड या दोन जागेसाठी होत असलेल्या पोटनिवडणूकीपुर्वी शिवसेना पक्ष आणि पक्षचिन्हाचा निर्णय घेण्यात येईल अशी शक्यता व्यक्त केली जात होती. परंतु आता अंधेरी पोटनिवडणूकीपूर्वी निवडणूक आयोगाने दोन्ही गटाला पक्ष आणि चिन्ह दिलं असल्यानं या संदर्भात तात्काळ निर्णय घेतला जाणार नाही ,अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.
सर्वोच्च न्यायालयात देखील राज्यातील सत्ता संघर्षावर सुनावणी सुरू आहे. येत्या १४ फेब्रुवारीपासून या प्रकरणावर सलग सुनावणी होणार आहे. निवडणूक आयोग जो पर्यंत सर्वोच्च न्यायालय महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाचा निर्णय देत नाही तोपर्यंत कुठलाही निर्णय देणार नसल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
शिवसेना, धनुष्यबाणाचं भवितव्य कधी ठरणार? मोठी अपडेट वाचा
RELATED ARTICLES
Recent Comments
Hello world!
on