Homeमहाराष्ट्रनगरच्या वाडिया पार्कमध्ये १६ कोटी रुपयांचा सिंथेटिक ट्रॅक होणार - खा. सुजय विखे...

नगरच्या वाडिया पार्कमध्ये १६ कोटी रुपयांचा सिंथेटिक ट्रॅक होणार – खा. सुजय विखे पाटील

७०व्या राज्य अजिंक्यपद निवड चाचणी कब्बडी स्पर्धेचे थाटामाटात उदघाटन संपन्न 

 अहमदनगर,दि.२८ डिसेंबर,(प्रतिनिधी) – नगर चे वाडिया पार्क हे नगरचे क्रीडा वैभव आहे. या ठिकाणी असलेल्या क्रीडा संकुलात लवकरच १६ कोटी रुपये खर्चून सिंथेटिक ट्रॅक  मंजूर झाला आहे लवकरच हा ट्रक वाडिया पार्क येथे होईल अशी घोषणा खासदार सुजय विखे यांनी केली. महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनच्या मान्यतेने आणि अहमदनगर जिल्हा हौशी कबड्डी संघटनेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ७० व्या राज्य कबड्डी स्पर्धेचे उदघाटन खासदार सुजय विखे पाटील यांच्या हस्ते संपन्न झाले. त्यावेळी ते बोलत होते. 

येथील वाडिया पार्क  क्रीडा संकुलात दिनांक २७ डिसेंबर ते ३० डिसेंबर २०२२ या कालावधीत या स्पर्धा पार पडत आहेत. वरिष्ठ गट पुरुष आणि महिला गटात अजिक्यपद आणि निवड चाचणी स्पर्धा होणार आहे. 

या वेळी व्यासपीठावर आयोजन समितीचे अध्यक्ष आणि राज्य शासनाच्या आदर्श गाव समितीचे कार्याध्यक्ष पदमश्री पोपटराव पवार, अहमदनगर जिल्हा हौशी कबड्डी संघटनेचे आजीव अध्यक्ष माजी आमदार दादाभाऊ कळमकर, सचिव प्रा. शशिकांत गाढे,   राज्य कबड्डी असोसिएशनचे सचिव आस्ताद पाटील, दिनकरराव पाटील,  शांताराम जाधव, अशोक पितळे, बाबुराव चांदोरे , पोलीस निरीक्षक संपत  शिंदे , जयंत वाघ,  उपायुक्त महसूल विभाग नाशिकचे संजय काटकर , जिल्हा क्रीडाधिकारी भाग्यश्री बिले महाराष्ट्र कबड्डी असोसिएशन चे सदस्य देसाई खजिनदार पांडे, प्रथम महापौर भगवान फुलसौंदर, सौ भरती पवार नगरसेवक बाळासाहेब बोराटे, योगीराज गाडे, दिलीप सातपुते, सचिन जाधव, बाळासाहेब हराळ,विजय मिस्कीन,प्रकाश बोरूडे  उपस्थित होते . 

यावेळी बोलताना विखे पुढे म्हणाले की, प्राध्यापक शशीकांत गाडे यांनी अहोरात्र मेहनत घेतली आहे. आणि नगरची स्पर्धा यशस्वी होणार आहे. राज्य संघटना आणि अजित पवार यांनी देखील नगरला हि स्पर्धा दिल्याबद्दल आपण आभारी आहोत. क्रीडा क्षेत्रात जसे सर्वपक्षीय नेते एका व्यासपीठावर एकत्र आलेले दिसले त्याप्रमाणे विकासाच्या प्रश्नावर देखील सर्वानी एकत्र यावे. कबड्डी संघटनेला आपले नेहमीच सहकार्य राहील.  नगर जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी जिल्हा कब्बडी असोसिएशन च्या विनंतीला मान देऊन एका मिनिटात ५० लाख रुपये खर्चाला मंजुरी देऊन तात्काळ स्पर्धेसाठी सिथेंटीक मॅट देण्यास मंजुरी दिली. राज्य शासन नेहमीच क्रीडा क्षेत्रातील विकासासाठी नेहमीच प्राधान्य देते. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री  देवेंद्र फडणवीस, राज्याचे क्रीडा मंत्री गिरीश मंत्री यांच्या मान्यतेने नगरच्या वाडिया पार्क क्रीडा संकुलाला १६ कोटी रुपयांचा विकास आरखडा मंजूर झाला असून या ठिकाणी लवकरच ८ लाईन चा  ऍथलेटिक्स सिंथेटिक ट्रॅक, लॉन्ग जंप, हाय जम्प, शॉर्ट पूट अशा सर्व खेळांना चालना मिळण्यासाठी मदत होईल पुढील महिन्यात पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते या कामाचे भूमिपूजन करण्यात येणार आहे . अशी घोषणा खासदार सुजय विखे यांनी केली.   स्वागत हौशी कबड्डी संघटनेचे सचिव प्रा. शशिकांत गाढे यांनी   केले.  यावेळी पदमश्री पोपटराव पवार यांचे भाषण झाले. आभार दादाभाऊ कळमकर यांनी मानले.  

यावेळी सलामीचा पुरुष गटातील सामना  नगर विरुद्ध हिंगोली असा झाला त्यात नगरने बाजी मारली. या स्पर्धेत राज्याच्या प्रत्येक जिल्ह्याचा पुरुष आणि महिला गटाचा संघ सहभागी झाला असून खेळाडू, प्रशिक्षक, आयोजक, पंच, वैद्यकीय अधिकारी क्रीडा संघटनेचे पदाधिकारी मिळून 600 जन नगरमध्ये दाखल झाले आहेत त्यांच्या निवास आणि भोजनाची व्यवस्था संघटनेच्या वतीने विविध ठिकाणी करण्यात आली आहे. सायंकाच्या सत्रात या स्पर्धा खेळवल्या जाणार आहेत.  10 हजार आसन क्षमतेची प्रेक्षक गॅलरी या ठिकाणी उभारण्यात आली आहे. हे स्पर्धा प्रथमच मेटवर खेळवली जाणार असून या स्पर्धेच्या प्रथम आयोजनाचा मान नगरला मिळाला आहे. या स्पर्धेला प्रो कबड्डी सारखा कॉर्पोरेट लुक देण्यात आला असून स्पोर्ट वुट या मोबाइल एप आणि यू ट्यूब चॅनल वर ही स्पर्धा थेट प्रसारित केली जाते आहे . एकचा वेळी या ठिकाणी 6 सामने खेळवले जात असून सहा ही सामने एकाच वेळी लाईव्ह दाखविण्यात येत आहेत. 

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!