अहमदनगर,दि.१० जानेवारी,(प्रतिनिधी) – देशात बहुचर्चित ५जी सेवा काही निवडक शहरात सुरू झाली आहे. नगर शहरात ही सेवा केव्हापासून उपलब्ध होणार याची सर्वांनाच उत्सुकता होती. पण नगरकरांसाठी एक आनंदाची बातमी आली आहे. डेटा अधिक वेगाने जाण्यासाठी अतिवेगवान इंटरनेटची मागणी वाढत असताना, ‘५-जी’ सेवा अहमदनगरमध्ये आजपासून सुरू झाली आहे. ही सेवा देणारा ‘रिलायन्स जिओ’ हा नगरमधील पहिला ऑपरेटर ठरला आहे.
आग्रा, कानपूर, मेरठ, प्रयागराज (उत्तर प्रदेश), तिरुपती, नेल्लोर (आंध्र प्रदेश), कोझिकोड, त्रिसूर (केरळ), नागपूर, अहमदनगर (महाराष्ट्र) येथे आजपासून जिओ ट्रू ५-जी सेवा मिळणार आहे. जिओ वापरकर्ते कोणत्याही अतिरिक्त शुल्काशिवाय एक जीबीपीएसपर्यंत स्पीडसह अमर्यादित ५-जी डेटाचा आनंद घेऊ शकणार आहेत.
रिलायन्स जिओने आज दहा शहरांमध्ये ही सेवा सुरू करण्याची घोषणा केली. यांपैकी बहुतांश शहरांमध्ये ५-जी सेवा सुरू करणारी रिलायन्स जिओ ही पहिली आणि एकमेव ऑपरेटर ठरली आहे. त्यामुळे जीओ ग्राहकांना अमर्यादित डेटा अनुभवण्यासाठी जिओ वेलकम ऑफरसाठी आमंत्रित केले जाईल. या सेवेमुळे ग्राहकांना केवळ सर्वोत्तम दूरसंचार नेटवर्कच मिळणार नाही, तर ई-गव्हर्नन्स, शिक्षण, ऑटोमेशन, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, गेमिंग, आरोग्यसेवा, कृषी, आयटी आणि एसएमईएस, तसेच सर्वच या क्षेत्रांमधील उद्योग-व्यवसाय वाढीच्या अनेक संधीही मिळतील.
फाईव्ह जी सेवेमुळे डेटा अतिवेगाने डाऊनलोड होणार, सध्या वेलकम ऑफरमध्ये अतिरिक्त शुल्क लागणार नाही. तसेच या सेवेसाठी सिम बदलण्याची गरज नाही. परंतु मोबाईल हँडसेट मात्र ५-जी आवश्यक असणार आहे.