पुणे, १ मे २०२३(ऑनलाईन वृत्त) – पॉलिसी काढून देण्याच्या बहाण्याने महिलेची तब्बल ५५ लाखांची फसवणूक पुणे शहरात ऑनलाईन फसवणूकीच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे. असाच आणखी एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पॉलिसी काढून देण्याच्या बहाण्याने सायबर चोरट्यांनी ज्येष्ठ महिलेची तब्बल ५५ लाख रुपयांची फसवणूक केल्याचे प्रकरण उघडकीस आले आहे. आता या संदर्भात महिलेने पोलिसांत धाव घेतली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आम्ही लाईफ पॉलिसी काढून देऊ तसेच त्याचावर मोठा फायदा काढून देऊ असे आश्वासन या सायबर चोरट्यांनी फिर्यादी महिलेला दिले होते. तसेच आम्ही बँकेचे लोकं आहोत हे अनेक वेळा सांगून त्यांनी या फिर्यादी महिलेचा विश्वास संपादन केला आणि त्यानंतर बँकेत पैसे जमा करायला सांगितले.
चोरट्यांच्या या भुल थापांना बळी पडून या महिलेने पैसे जमा करण्यास सुरुवात केली. तसेच वेळोवेळी काही रक्कम विविध ३६ बँकांमध्ये जमा केली. पैसे भरल्याची बनावट पावती देखील या सायबर चोरट्यांनी त्यांना दिली आहे. हा सगळा प्रकार २०१४ ते २०१९ पर्यंत सुरू होता.
मात्र, काही काळाने आपल्याला एक ही रुपया मिळत नसून आपली फसवणूक झाल्याचे या महिलेच्या लक्षात आले. ज्यानंतर तिने पोलिसांकडे धाव घेतली. प्राथमिक माहितीनुसार, या सात मोबाईल धारकांवर पोलिसांनी गुन्हे दाखल केले असले तरी सुद्धा या टोळीची ही खरे नावेन आहेत का याचा तपास सुरू आहे.