अहमदनगर,दि.२६ जानेवारी,(प्रतिनिधी) – अहमदनगर येथील बारादरी लमनतांडा येथे रस्त्याच्या कडेला थांबलेला ११ फुटी अजगर (इंडियन रॉक पायथन) दिवसा आढळून आला. सर्पमित्र कृष्णा बेरड पाटील यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी त्याठिकाणी जाऊन मोठ्या कौशल्याने सदर अजगर पकडला. रात्री घुशीचा शिकार केल्याने तो सुस्त बसला होता. हा अजगर पकडल्यानंतर तो ११ फुटी व २० ते २५ किलो वजनाचा असल्याचे निदर्शनास आले.
भलामोठा अजगर पाहून उपस्थितांच्या मनात धडकी भरली. तर शेवटी अजगर पकडल्यानंतर नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला. त्याच दिवशी कृष्णा बेरड पाटील यांनी वन अधिकारी गाडेकर व ठोंबरे यांच्या मार्गदर्शनाखाली निसर्गात मुक्त करण्यात आले. यावेळी अंकित चव्हाण, ओम जंगम, आकाश पवार, बंटी लाहुडे, वामन शेट आदी उपस्थित होते. यावर्षी अजगर, घोणस व मन्यार सर्प जातीमध्ये वाढ झाली आहे. नागरिकांनी कोठेही सर्प आढळल्यास त्यांना मारू नये, त्यासाठी मो.नं.९३७००७५५५५ या नंबरवर संपर्क साधण्याचे आवाहन कृष्णा बेरड पाटील यांनी केले आहे.