मुंबई,दि.७ फेब्रुवारी,(ऑनलाईन प्रतिनिधी) – बॉलिवूड मध्ये सर्वात जास्त चर्चेत असलेले सिद्धार्थ मल्होत्रा आणि कियारा अडवाणी आज जैसलमेरच्या सूर्यगढ पॅलेसमध्ये लग्नबंधनात अडकणार आहेत. या आलिशान महालात दोघेही नातेवाईक आणि जवळच्या लोकांच्या उपस्थितीत लग्नबंधनात अडकतील. काल ६ फेब्रुवारी रोजी मेहंदी आणि संगीत सोहळा पार पडला. संगीत नाईटसाठी सूर्यगढ पॅलेस गुलाबी रंगाने चमकला होता. पॅलेसचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. या आलिशान विवाहसोहळ्यासाठी अनेक बॉलिवूड कलाकारही पोहोचले आहेत. काही तासातच किआरा आणि सिद्धार्थ लग्नबंधनात अडकणार आहेत. शाही अंदाजात ते नातेवाईकांच्या उपस्थितीत सात फेरे घेतील.
या सेलेब्रिटी वेडिंगसाठी सूर्यगढ पॅलेसवरील लक्झरी व्हिला बुक करण्यात आहे. या व्हिलामध्ये तब्बल ८४ खोल्यांचं बुकिंग करण्यात आलं आहे. तर पाहुण्यांसाठी ७० गाड्याही बुक करण्यात आल्या असल्याची माहिती पॅलेस प्रशासनाने दिली आहे. सूर्यगढ पॅलेसवरील एका दिवसाचं भाडं एक ते दोन कोटींच्या घरात आहे.