अहमदनगर,दि.११ फेब्रुवारी,(प्रतिनिधी) – वंचित बहुजन आघाडीचे अहमदनगर दक्षिण लोकसभेचे उमेदवार सुधाकर आव्हाड यांच्यासह अनेक वंचित बहुजन आघाडीतील नेत्यांसह कार्यकर्त्यांनी भाजपाच्या मुंबई प्रदेश कार्यालयात पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या प्रमुख उपस्थितीत भाजपमध्ये जाहीर प्रवेश केला. यावेळी भाजपाचे प्रवक्ते गणेश हाके आदीसह भाजपचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की भाजप पक्ष हा मुळातच तळागाळातील वंचितांना सत्तेत सहभागी करून त्यांच्या हितासाठी काम करत आहे. यामुळे भाजपात प्रवेश करणा-या सुधाकरराव आव्हाडासह अन्य नेते, कार्यकर्त्यांना वा-यावर सोडणार नाही. या दरम्यान वंचित बहुजन आघाडीचे बारामती लोकसभेचे उमेदवार नवनाथ पडळकर, जालना लोकसभाचे उमेदवार शरदचंद्र वानखेडे, मुंबई दक्षिण संजय भोसले, शिरूरचे राहुल ओव्हाळ, बजरंग क्रांती दलाचे प्रदेशाध्यक्ष प्रकाश राठोड, वंचित बहुजन आघाडीचे विधानसभा उमेदवार दीपक बोराडे, बापुसाहेब ताजणे, रामदास महानोर, शशिकांत मतकर, सुरेश रणदिवे, अशोक कोळेकर, शेखर बगाळे, सुरज रणदिवे, अनिल गायकर, गजानन देवकाते, गणेश कुंभार आदीसह शेकडो कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पक्षांमध्ये प्रवेश केला आहे.