अहमदनगर,दि.१० फेब्रुवारी,(प्रतिनिधी) – शिवसेनेच्या (बाळासाहेबांची) वतीने मुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे यांचा वाढदिवस आरोग्य दिन म्हणून साजरा करण्यात आला. जिल्ह्यात मोफत आरोग्य शिबिर, रक्तदान शिबिर व विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात आले. अहमदनगर जिल्हा रुग्णालयात बुधवारी (दि.9 फेब्रुवारी) महाआरोग्य शिबिराचे उद्घाटन शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अनिल शिंदे यांच्या हस्ते झाले. यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संजय घोगरे, अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. मनोज घुले, शहर प्रमुख दिलीप सातपुते, संपर्कप्रमुख सचिन जाधव, बाबुशेठ टायरवाले, अनिल लोखंडे, संग्राम शेळके, योगेश गलांडे, महेश लोंढे, अभिषेक भोसले, अक्षय कातोरे, ओंकार शिंदे, गौरव शिंदे, काका शेळके, आनंदराव शेळके, अनिकेत कराळे, रणजीत परदेशी, प्रल्हाद जोशी, चंद्रकांत उजागरे, किरण उनवणे, पोपटराव पाथरे, शशांक महाले, राज कोंडके, दामोदर भालसिंग, बाबू काकडे आदींसह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
प्रास्ताविकात जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. संजय घोगरे म्हणाले की, महाराष्ट्र शासन व आरोग्य विभागाच्या वतीने सर्वसामान्यांना आरोग्यसेवा देऊन आधार देण्याचे काम करत आहे. महाआरोग्य शिबिरातंर्गत जागृक पालक, सदृढ बालक या अभियानाची सुरुवात करण्यात आली आहे. यामध्ये जन्मलेल्या बाळकापासून 18 वर्ष वयापर्यंतच्या सर्व बालकांची आरोग्य तपासणी केली जाणार आहे. जिल्ह्यात 16 लाख पेक्षा जास्त बालकांच्या तपासणीचा उद्दिष्ट असून, यासाठी जिल्ह्यात सहाशे टीम तयार करण्यात आले असून, ते विविध भागात मुलांची आरोग्य तपासणी करणार आहे. बालक आजारी असल्यास त्याच्यावर मोफत उपचार करण्यात येणार आहे. तसेच जिल्ह्यात महारक्तदान शिबिराचे आयोजन देखील करण्यात आले आहे. जिल्ह्यात 26 ठिकाणी मुख्यमंत्री यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिर होत असल्याची माहिती त्यांनी दिली. ग्रामीण रुग्णालयात आरोग्य सुविधा बळकट करण्यासाठी राज्य सरकार प्रयत्न करत असल्याचे सांगितले. पाहुण्यांचे स्वागत वैद्यकिय अधिकारी डॉ. मनोज घुले यांनी केले.
जिल्हाप्रमुख अनिल शिंदे म्हणाले की, सर्वसामान्यांसाठी झटणारे नेतृत्व मुख्यमंत्री शिंदे यांच्या रुपाने महाराष्ट्राल लाभले. अहोरात्र ते समाजासाठी उपलब्ध असतात. सर्वसामान्यांना न्याय व कार्यकर्त्यांना ताकत देणारा हा पक्ष आहे. हिंदूहृदय सम्राट स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचे खरे वारसदार एकनाथ शिंदे असून, त्याच विचाराने समाजात कार्य सुरु असल्याचे त्यांनी सांगितले.
दिलीप सातपुते यांनी महाराष्ट्रात शासनाच्या माध्यमातून आरोग्य क्षेत्रात उत्तमपणे कार्य सुरु आहे. यामुळे सर्वसामान्यांना आरोग्य सुविधा मिळण्यास सोपे झाले आहे. श्रीकांत शिंदे फाऊंडेशनच्या माध्यमातून गरजू रुग्णांचे प्रश्न सोडविण्यात येत आहे. रुग्णसेवेचा वसा जपून गरजू रुग्णांना नवजीवन देण्याचे कार्य केले जात असल्याचे त्यांनी सांगितले.
बाबुशेठ टायरवाले म्हणाले की, महाराष्ट्राला कार्यकर्तृत्व असलेला मुख्यमंत्री लाभला. गरिबांसाठी अनेक योजना मुख्यमंत्री शिंदे राबवित आहे. शेतकरी, गोरगरिबांना न्याय देण्याचे व सेवा करण्याचे काम राज्यात शिंदे सरकार करत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
जिल्हा रुग्णालयात झालेल्या महाआरोग्य शिबिरातंर्गत रुग्णांची व बालकांच्या सर्व प्रकारची मोफत तपासणी करण्यात आली. तसेच शिवसेनेच्या (बाळासाहेबांची) वतीने रुग्णांना फळांचे वाटप करण्यात आले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतलेल्या व्हिडिओ कॉन्फरन्समध्ये शिवसेनेचे पदाधिकारी सहभागी झाले होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुरेखा आंधळे यांनी केले. आभार अधिसेविका छाया जाधव यांनी मानले.