मुंबई,दि.७ फेब्रुवारी,(ऑनलाईन प्रतिनिधी) – ईडीने माजी अस्लम शेख यांच्या अडचणीत वाढ होणार आहे.मढ मालाड परिसरातल्या बेकायदेशीर स्टुडिओ संदर्भात बनवलेला पालिकेचा अहवाल मागवला आहे. पालिकेचे उपायुक्त हर्षद काळे यांनी बजावलेल्या अहवालाची माहिती ईडीने पालिकेकडे मागवली आहे. या प्रकरणावरून माजी मंत्री काँग्रेसचे आमदार अस्लम शेख यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. माजी मंत्री अस्लम शेख यांनी बेकायदेशीर स्टुडिओ बांधल्याचा आरोप भाजप नेते किरीट सोमय्यांनी केला होता.
उपायुक्त हर्षद काळे यांनी मढ परिसरात असणाऱ्या ४९ स्टुडिओसंदर्भात ५ हजार पानांचा एक अहवाल करून चहल यांच्याकडे सोपावला आहे. शिवाय या बेकायदेशीर स्टुडिओ प्रकरणात जर एका एखादा गुन्हा दाखल झाला असेल, तर त्याचीही माहिती ईडीकडून मागविण्यात आली आहे.
मुंबईतील मढ येथे बेकायदा स्टुडिओ उभारण्यात आले आहे. यात तब्बल एक हजार कोटींचा घोटाळा झाला आहे. स्टुडिओ उभारताना सीआरझेड नियमांचे उल्लंघन झाले आहे. समुद्रात स्टुडिओ उभारले पण कागदोपत्री ही जागा समुद्रापासून दूर असल्याचे दाखवले आहे.
२०२१ मध्ये हे स्टुडिओ उभारण्यात आले. पर्यावरण खात्याने ६ महिन्यासाठी सेट उभारण्याची परवानगी दिली होती. पण कांदळवन तोडून स्टुडिओ उभारल्याचा आरोप सोमय्यांनी केला होता. अस्लम शेख यांच्या आशिर्वादाने घोटाळा झाला, या जागेवर आदित्य ठाकरे यांनी भेट दिली होती, असा सोमय्यांचा आरोप आहे.
माजी मंत्री अस्लम शेख यांच्या अडचणीत वाढ होणार? जाणून घ्या
RELATED ARTICLES
Recent Comments
Hello world!
on