अहमदनगर,दि.८ फेब्रुवारी,(प्रतिनिधी) –
महिलांना निरोगी व आनंदी जीवनासाठी योग्य प्राणायामाचे धडे प्रयास व नम्रता दादी-नानी ग्रुपचा उपक्रम महिलांसाठी राबवण्यात आला आहे. महिलांनी आनंदी व निरोगी राहण्यासाठी हा उपक्रम राबवण्यात आला आहे. घाम गाळणे म्हणजे योग्य नव्हे सुख योगाचे योग गुरु सागर पवार यांचे प्रतिपादन मानसिक व शारीरिक स्वास्थ्यसाठी योग प्राणायमा शिवाय पर्याय नाही शास्त्रीय अचूक पद्धतींनी योग्य केल्यास त्याचे निश्चित फायदे शरीराला मिळतात असे मार्गदर्शन सुख योगाचे गुरु सागर पवार यांनी केले आहे.
याप्रसंगी मनीषा भागानगरे, गीतांजली भागानगरे ग्रुप अध्यक्ष अलकाताई मुंदडा,उपाध्यक्ष सविता गांधी, सचिव शोभा पोखरणा, अनिता काळे, छाया राजपूत, हिरा शहापुरे, शशिकला जरेकर, स्वप्ना शिंगी,सादना बाळगट,सुजाता पुजारी,सारिका कासत,जयश्री पुरोहित,उषा गुगळे आदींसह महिला मोठ्या संख्यने उपस्थित होत्या यावेळी महिलांनसाठी दीप्ती मुंदडा यांनी मनोरंजक व बौद्धिक खेळाच्या स्पर्धा घेतल्या या स्पर्धेतील विजेत्या महिलांना कार्यक्रमाचे प्रायोजक सुहाना मसाले विशाल घोडके यांच्यावतीने बक्षीस देण्यात आले आहे. तसेच येथे योग गुरु सागर पवार यांनी महिलांना आहाराचे शरीर सदृढ राहण्यासाठी मार्गदर्शन केले आहे. तणावाने आजाराच्या उंबरठ्यावर असलेल्या व्यक्तीचे इंद्रिय त्याच्या इच्छेप्रमाणे कार्यरत नसतात. इंद्रियांवर ताबा मिळविण्यासाठी प्राणायाम कार्य करतो.
योग-प्राणायामद्वारे स्वत:ला वेळ दिल्यास जीवनात आनंद व उत्साह निर्माण होऊन निरोगी जीवन जगता येते. मन शांत नसल्यास चिडचिड होऊन कामात एकाग्रता निर्माण होत नाही. त्यामुळे अनेक कामे व निर्णय चुकत असल्याचे सांगितले. तर त्यांनी महिलांना निरोगी आरोग्यासाठी योग आपल्या दैनंदिन जीवनाचा अविभाज्य अंग बनविण्याचे आवाहन केले आहे. आदिती परदेशी यांनी विविध आसने अचुक पध्दतीने करण्याचे प्रात्यक्षिक दाखविले. प्रयास व दादी-नानी ग्रुप अध्यक्षा अलकाताई मुंदडा यांनी देखील योग गुरु सागर पवार यांचे आभार मानले.