अहमदनगर,दि.११ फेब्रुवारी,(प्रतिनिधी) – ‘प्रेम सेवा लोभ असावा’ हे ब्रीद वाक्य घेऊन चालणाऱ्या मराठी मिशनला २१० वर्ष पूर्ण होऊन येणाऱ्या १२ फेब्रुवारी २०२३ रोजी २११ व्या वर्षात पदार्पण होत आहे. मराठी मिशन जयंती निमित्ताने विशेष प्रार्थना सभेचे आयोजन करण्यात येणार असल्याचा निर्णय घेण्यात आला. मराठी मिशनचे सचिव डॉ.डी.जी भांबळ व मराठी मिशनच्या अध्यक्ष डॉ.विजया जाधव मॅडम यांच्या उपस्थितीत बैठक संपन्न झाली.
यावेळी डॉ. प्रभाकर, मराठी मिशन विश्वस्त एस. के आल्हाट, राजू चक्रनारायण, प्रियंका शिंदे, शोभा अमोलिक, लता पंडित, पा. दीपक थोरात, सामाजिक कार्यकर्ते राजू दादा देठे, जिल्हाध्यक्ष वंचित बहुजन आघाडीचे प्रतिक बारसे, अध्यक्ष ख्रिस्ती सेना नितीन दादा खंडागळे, सामाजिक कार्यकर्ते सुधीर दादा देठे, डॉ.खरात, प्रतिक ठोंबरे, अनिलभाऊ पालघमल, जिल्हा उपाध्यक्ष सिस्टर शैला गंगावने आधी सह प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. मराठी मिशनचे सचिव डॉ.डी.जी भांबळ म्हणाले की संपूर्ण समाज बांधवांनी २११ व्या मराठी मिशन जयंती निम्मत क्लेरा ब्रूस ग्राउंड येथे विशेष प्रार्थना सभेचे आयोजन करण्यात आले असून संपूर्ण ख्रिस्ती समाज बांधवांनी उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.