अहमदनगर,दि.१८ फेब्रुवारी,(प्रतिनिधी) – निवडणूक आयोगानं उद्धव ठाकरे गटाला मोठा धक्का दिला आहे. शिवसेना पक्षाचं नाव आणि धनुष्यबाण एकनाथ शिंदे यांना निवडणूक आयोगानं दिलं आहे. एकनाथ शिंदे यांनी 40 आमदारांना घेऊन शिवसेनेत बंड करत बाहेर पडले आणि भाजपसोबत जात नवं सरकार स्थापन केलं. त्यानंतर गेल्या सहा महिन्यांपासून सत्तासंघर्ष आणि पक्ष चिन्ह आणि पक्ष नाव यांचा वाद निवडणुक आयोगात गेला होता अनेक दिवस निकालाच्या प्रतिक्षेनंतर आज आयोगाने निकाल दिला आहे.
एकनाथ शिंदे यांच्याकडे 67 पैकी 40 आमदार आहेत. तर, लोकसभेतील 13 खासदार शिंदे गटासोबत आहेत. तर उद्धव ठाकरे यांच्यासोबत लोकसभेतील 7 खासदार राज्यसभेतील 3 खासदार आणि विधानसभेतील 13 आमदार सोबत आहेत. निकाल देताच एकनाथ शिंदे यांनी ट्विटरचा प्रोफाइल फोटो बदलला आहे. सोबतच अनेक आमदार खासदारांनी देखील प्रोफाइल फोटो बदलला आहे. हा निकाल लागल्यापासून शिंदे गटात आनंदाचं वातावरण आहे. तर ठाकरे गटात दुःखाचं वातावरण पाहिला मिळत आहे.
राज्यातील सत्तासंघर्षानंतर केंद्रीय निवडणूक आयोगाकडून शिवसेना नाव आणि धनुष्यबाण चिन्ह हे शिंदे गटाच्या (बाळासाहेबांची) शिवसेनेला मिळाल्याचा बोल्हेगाव फाटा येथे बोल्हेगाव, नागापूर व एमआयडीसी परिसरातील शिवसैनिकांनी फटाक्यांच्या आतषबाजीत पेढे वाटून जल्लोष केला. शिवसेनेचे (बाळासाहेबांची) जिल्हाध्यक्ष योगेश गलांडे, जिल्हाध्यक्ष आकाश कातोरे व नगरसेवक मदन आढाव यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये झालेल्या जल्लोषाप्रसंगी हर्षवर्धन देशपांडे, राजू ढगे, अक्षय ठाणगे, नवनाथ कातोरे, पप्पू कातोरे, अतुल पाखरे, दत्ता ढोकणे, सागर कांडेकर, योगेश कातोरे आदी उपस्थित होते. (छाया-वाजिद शेख-नगर)