मुंबई,दि.९ फेब्रुवारी,(ऑनलाईन प्रतिनिधी) – काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. कार्यपद्धती आक्षेप घेत पक्षातील ज्येष्ठ नेत्यांनी त्यांचा विरोध केला आहे. या प्रकरणी दिल्लीत वरिष्ठ पातळी देखील हालचाली सुरु झाल्या आहे. काँग्रेसमधील अंतर्गत कलह आता चव्हाट्यावर आला आहे. नाना पटोलेच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.
राज्यात बाळासाहेब थोरात विरुद्ध नाना पटोले संघर्ष सुरू असताना महाराष्ट्रातील नेत्यांची दिल्ली वारी केली आहे. माजी मंत्री विजय वडेट्टीवार,अमर राजूरकर यांनी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या भेटीला गेले आसुन राज्यातील काँग्रेसच्या राजकीय परिस्थितीवर चर्चा करणार आहे. अशोक चव्हाण समर्थक नेते हि दिल्लीत पक्षश्रेष्ठींच्या भेटीला दाखल झाले आहे.
त्यामुळे दिल्लीत कॉंग्रेस नेत्यांची नाना पटोले हटाव मोहीम सुरु असल्याचे बोलले जात आहे. नागपूर विधानपरिषदेच्या उमेदवारीवरून नाना पटोले आणि विदर्भातील काँग्रेस नेत्यांमध्ये संघर्ष झाला आहे. सुधाकर आडबोले यांच्याऐवजी नाना पटोलेंनी दुसऱ्याच उमेदवाराचे नाव समोर केले होते.
सुनील केदार, विजय वडेट्टीवार, अभिजित वंजारी या नेत्यांनी आडबोले यांचे नाव जाहीर केली. बाळासाहेब थोरात यांनी विधिमंडळ पक्षनेतेपदाचा राजीनामा दिल्यानंतर पटोले यांच्या विरोधातील मोहिम सुरु झाली आहे. नाना पटोले यांच्या विरोधात अशोक चव्हाण, विदर्भातील नेते, बाळासाहेब थोरात एकवटल्याची राजधानी दिल्लीत चर्चा सुरु आहे. दिल्लीतील भेटीगाठींमुळे नाना पटोले यांच्या अडचणी येत्या काळात वाढणार असल्याचे दिसून येत आहे.
नाना पटोलेच्या अडचणीत वाढ; दिल्लीत हालचालींना वेग
RELATED ARTICLES
Recent Comments
Hello world!
on