Homeराशीभविष्यआजचे राशिभविष्य (दिनांक ७ फेब्रुवारी २०२३)

आजचे राशिभविष्य (दिनांक ७ फेब्रुवारी २०२३)

जाणून घ्या आज मंगळवार दिनांक ७ फेब्रुवारी रोजीचे आपले राशिभविष्य

मेष – कला क्षेत्रातील व्यक्तींकरिता उत्तम योग आहे. नवीन प्रकल्प हाती येतील. केलेल्या कामाचे कौतूक होऊन मान सन्मान वाढेल. नोकरीत बढ़ती मिळेल. वरिष्ठाकडून मोठी जबाबदारी मिळू शकते. नातेवाईकांशी संबंधात स्नेह वाढेल. संपत्तीबाबत असलेल्या कामात केलेली धावपळ फायदेशीर राहिल. रोजगारात नवीन योजना राबवाल. व्यवसायात आर्थिक लाभ वाढणार आहे. उत्पन्नात वाढ होईल. कौटुंबिक सुख-शांती मिळेल. नवीन घर, वाहन खरेदीचा योग आहे. वडिलोपार्जित इस्टेटीतून लाभ होईल. संततीकडून सुख समाधान लाभेल.

वृषभ – मनात उर्जा निर्माण करणारा दिवस आहे. रोजगारात आर्थिक लाभ होईल. नोकरीत जबाबदारीत वाढ होईल. वरिष्ठांकडून अपेक्षित सहकार्य लाभणार आहे. प्रयत्नवादी रहा. आपली स्थिती मजबूत होईल. कौटुंबिक सामजस्य राहील. व्यापारात वाढ होवुन अनुकुल स्थिती राहणार आहे. वेळेचा चांगला उपयोग करून आपल्या आशा आकांक्षा पूर्ण करण्याच्या दृष्टीकोनातून कामाला लागा. घर वाहन खरेदीचा योग आहे. वडिलांच्या सहकार्याने व्यवसायातील अडचणी दुर होतील. वडिलोपार्जित इस्टेटीतून लाभ होईल.

मिथुन – रचनात्मक कामान यश मिळेल. कुंटुबातील ज्येष्ठ व्यक्तीकडून विशेष सहकार्य मिळेल. मोठ्यांची मर्जी व मान राखाल. कुटुंबातील सुखद वातावरण निर्माण होईल. खर्चावर काहीस नियंत्रण ठेवावे लागेल. व्यापारात आर्थिक योग उत्तम आहे. नव्या योजना कार्यान्वित करु शकाल. नोकरी व्यवसायात भरभराट होण्याची शक्यता असून बढतीचे योग आहे. आर्थिक उन्नती करणारा दिवस ठरेल. आपले सुप्त गुण प्रकर्षाने उजळून निघतील. प्रतिष्ठा वृद्धिंगत होईल. राजकीय क्षेत्रातील व्यक्तींकडून सहकार्य लाभेल. शासकिय योजनेतून लाभ होईल.

कर्क – नोकरीत नवीन योजनेवर कार्य कराल. मागील काही दिवसापासून अपूर्ण राहीलेली कामे पूर्ण होतील. स्थावर मालमत्ता या संबंधातील समस्या दूर होतील. व्यापारात लक्षपूर्वक नियोजन केल्यात वाढ होईल. धनलाभ होण्याची शक्यता आहे. कौटुंबिक सौख्य लाभेल. जोडीदाराकडून सहकार्य मिळेल. जोडीदार नोकरीत असेल तर प्रमोशन बढतीचे योग आहेत. नवीन मित्र परिवार जोडला जाईल. कला क्रिडा क्षेत्रातील व्यक्तींना मानसन्मान व पुरस्कार मिळतील. मित्रमैत्रिणींकडून आर्थिक मदत मिळेल. सफलतापूर्ण दिवस आहे.

सिंह – आपल्या स्वभावातील गुणदोष ओळखा. कामकाजात व्यत्यय निर्माण होईल. उत्पन्नापेक्षा खर्च अधिक होईल. व्यवसायात वादविवाद होऊ शकतात. अनिश्चितेमुळे वैचारिक पातळीवर वातावरण ताणतणात्मक राहिल. रोजगारात कर्ज घेण्याची वेळ येऊ शकते. कौटुंबिक समस्याकडे लक्ष राहणार नाही. शत्रुपक्ष वरचढ राहिल.आपल्या कामात मानसिक दृष्या पीडादायक दिनमान आहे. शासकीय कर्मचारी असाल तर खोट्या प्रकरणात गुंतले जाण्याची शक्यता आहे. मानसिक स्वास्थ राखा.

कन्या – नोकरीत वरिष्ठ सदस्यांसोबत विवाद निर्माण होण्याची शक्यता आहे. विरोधकांच्या कारवायांना बळी पडणार नाही याची विशेष काळजी घ्या. रागावर नियंत्रण ठेवून वाटचाल करावी. अतिरिक्त ताणतणाव वाढणार आहे. वादविवाद टाळावेत. नव्या ओळखीवर फारसे विसंबून राहू नका. व्यापारात आर्थिक नुकसान होण्याची शक्यता आहे. जामीन राहू नका अन्यथा फसवणुक होईल. आर्थिक हानी होण्याची शक्यता आहे. शक्यतो आज प्रवास टाळावा. अनिद्रेचा त्रास होईल.

तूळ – कला साहित्य क्षेत्रातील व्यक्तींना मोठे यश लाभेल. राजाश्रय मिळेल. नोकरीत मनासारखी बदली किंवा पदोन्नती मिळण्याचे योग आहेत. व्यापारात आर्थिक आवक चांगली राहील. नवीन व्यवसायिक प्रस्ताव येतील. धन प्राप्तीत वाढ होईल. कौटुंबिक सुखशांती आनंददायक वातावरण राहिल. प्रवासातुन आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. वडिलांकडून आर्थिक सहकार्य लाभेल. राजकारणातील व्यक्तींना पदप्राप्ती आणि प्रतिष्ठा लाभेल. आरोग्य प्रकृती स्थिर व उत्साहपूर्ण राहील.

वृश्चिक – वेळेचा अपव्यय होणार नाही याची काळजी घ्या. नोकरीमध्ये केलेल्या कामाचे महत्व वाढेल. राजकीय, सामाजिक कार्यात नवीन योजनेतून लाभ होईल. मित्रमैत्रिणींकडून आर्थिक मदत मिळेल. नोकरीत नवीन संकल्पना मांडाल. व्यापारात गुंतवणूक फायदेशीर ठरेल. अपेक्षेपेक्षा आधिक लाभ होईल. व्यवहार कुशलतेमुळे भागीदारीतील संबंध अधिक दृढ होतील. धार्मिक, शैक्षणिक कार्यात सहभाग घ्याल. कुटुंबात मंगलकार्य, धार्मिक कार्य घडतील. परदेश भ्रमणात लाभ होईल. कलाकारांना संधी मिळेल.

धनू – नोकरीत कामाचा ताण वाढेल. नोकरीच्या ठिकाणी अडचणीचा सामना करावा लागू शकतो. स्थानबदलाची शक्यता आहे. रागाचा अतिरेक टाळावा. आळसाचा अतिरेक होईल. स्वभावात राग, चिडचिडेपणा येईल. मनात नैराश्य व असमाधानी भावना निर्माण होऊ शकते. मानसिक क्लेश अस्वस्थता जाणवेल. व्यापारात जास्त मेहनत घ्यावी लागणार आहे. मानसिक, शारिरिक आरोग्याबाबत अडचणी अदभवू शकतात. कौटुंबिक पातळीवर अनियोजित खर्च वाढेल. पत्नीच्या आरोग्याची चिंता निर्माण होऊ शकते. शक्यतो दुरवरचे प्रवास टाळावेत. अपघात भय संभवते.

मकर – मितभाषी रहा अन्यथा अडचणीचा सामना करावा लागेल. व्यापारात प्रतिकुल परिस्थिती निर्माण होईल. भागीदारासोबत सामंजस्यपूर्ण व्यवहार ठेवा. नोकरीत आपल्या मनाच्या विरोधात वातावरण निर्माण होईल. आपले विरोधक हितशत्रुकडून आपल्या विरोधात वातावरण तयार केले जाईल.मन लावून काम करा. व्यापारान नवीन योजना असतील तरच आज टाळा. कुंटुबाकडून सहकार्य लाभणार नाही. कुटुंबातील सदस्यांच्या आरोग्याच्या बाबतीत दुर्लक्ष करु नका. निरर्थक वेळ वाया घालवू नका. आरोग्यावर लक्ष द्या.

कुंभ – आर्थिक लाभाची शक्यता आहे. कुटुंबावर खर्च होईल. वादविवाद संपुष्टात येतील. नोकरीत मनासारखी बढ़ती व बदली होण्याची शक्यता आहे. सामाजिक कार्यातून मानसन्मान वाढेल. कामाबाबत विसंबून राहु नका. कौटुंबिक वातावरण समाधानाचे व आनंददायी राहिल. प्रवास सुखकर होईल.प्रवासातून आर्थिक लाभाची शक्यता आहे. भांवडाकडून आर्थिक सहकार्य मिळेल. मानसिक स्वास्थ बिघडणार नाही याची काळजी घ्या. गुप्तशत्रुपासुन सावध रहा.

मीन – एखादा मोठा आर्थिक व्यवहार होण्याची शक्यता आहे. देण्याघेण्यात व्यवहारात नोकरीत आपल्या नियोजनाची व बुद्धिमत्तेची प्रशंसा होईल. कुटुंबाकडे दुर्लक्ष करू नका. वारसाहक्काने सांपत्तिक मदत मिळेल. भागीदारीत लाभ होतील. आपल्या तार्किक बुद्धीने प्रतिस्पर्ध्यावर विजय मिळवाल. स्वसंपादित धनाचा उपभोग घ्याल. व्यवसायानिमित्त प्रवास होईल. प्रवासातून लाभ होतील. शासकीय कामकाजासाठी शुभदिवस आहे. नवीन रोजगारात परिक्षेत व मुलाखतीत यश संपादन होईल. आरोग्य सांभाळा. पित्त प्रकृती असलेल्यांनी सावधानी बाळगा.

(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही,तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!