Homeराशीभविष्यआजचे राशिभविष्य (दिनांक १२ फेब्रुवारी २०२३)

आजचे राशिभविष्य (दिनांक १२ फेब्रुवारी २०२३)

जाणुन घ्या आज रविवार दिनांक १२ फेब्रुवारी २०२३ रोजीचे आपले राशिभविष्य

मेष – मित्र किंवा सहकारी यांच्यावर जास्त विश्वास करू नका. मानप्रतिष्ठा कमी होईल. मानपमान नाट्य घडतील. विसभोळेपणा जाणवेल. एखाद्या विपरित घटनेतुन लाभ होण्याची शक्यता आहे. शासनाकडून होणारे लाभ मिळतील. नोकरी व्यापारात आर्थिक प्राप्तीसाठी खुप झगडावे लागेल. स्पर्धकांच्यावर लक्ष ठेवा. हितशत्रु, गुप्तशत्रूचा त्रास जाणवेल. नातेवाईकांना दुखवू नका. जोडीदाराची प्रकृती सांभाळा.

वृषभ – साहसी निर्णय घ्याल.नोकरीत कामाप्रती ओढ निर्माण होईल. शासकीय योजना आमलात येतील. काही नवनविन कल्पना सूचतील. यशवी व्हाल. फायदेशीर दिवस राहणार आहे. व्यापार व्यवसाय, बांधकाम क्षेत्रातील व्यक्तींकरिता उत्तम दिनमान आहे. कुंटुंबातील अडचणी दूर होतील. पत्नीशी चांगले संबंध राहतील. आखलेल्या योजना पूर्ण होणार आहेत.शुभवार्ता ऐकायला मिळेल. कौटुंबिक सौख्य समाधानकारक राहिल.

मिथुन – वाहन, स्थावर संपत्तीचे सौख्य लाभेल. विरोधकावर मात केल्यामुळे आपल्या किर्तीत वाढ होईल. नोकरी, व्यापाराचं क्षेत्र विस्तृत होईल. व्यवसायाला चालना देण्याचा प्रयत्न राहील. भांवडाकडून सहकार्य लाभेल. काम करण्याच्या पद्धतीत सुधारणा होईल, फायदेशीर व्यवहार राहतील. कौटुंबिक वातावरण समाधानी राहिल. सुख व शांतीचे वातावरण राहिल. आपले मनोबल, मनोधैर्य उचांवलेल असेल. नवीन घर वाहन खरेदीस अनुकूल दिवस आहे.आरोग्य उत्तम राहणार आहे. मनस्वास्थ लाभेल.

कर्क – मित्रमैत्रिणी अथवा वैवाहिक जोडीदाराच्या मदतीने काही आनंदाच्या घटना घडू शकतील. जोडीदाराच्या महत्वकांक्षा पूर्ण होतील. प्रयत्न केल्यास चांगले यश मिळणार आहे. अडकलेला पैसा मिळु शकेल. व्यापारात नवीन प्रस्ताव येतील. आर्थिक लाभासाठी खुप उलाढाली कराल. मुलांच्या कामाकडे लक्ष राहु द्या. प्रकृतीची काळजी घ्या. महत्वाची कामे आज पूर्ण कराल. प्रेमप्रकरणात यश येईल. स्वतःला सिद्ध कराल.लेखनक्षेत्रातील व्यक्तीनी नवीन प्रस्ताव योजना मिळतील. प्रगतीकारक दिनमान आहे.

सिंह – आपली कामे यशस्वीपणे पार पाडाल. वरिष्ठांकडून प्रशंसा मिळेल. व्यापारात आर्थिक प्राप्तीत वाढ होईल. नियोजन उत्तम केले तर निर्णायक कामात यश मिळेल. आपल्या इच्छा आकांक्षा पूर्ण होण्याचे योग आहेत. प्रतिष्ठित व्यक्तींशी संबंध वाढतील. संततीची प्रगती पाहून मन समाधानी राहील. परदेशभ्रमण घडेल. कामासाठी दुरचे प्रवास घडतील. कोणतेही काम जबाबदारीने करावे. व्यापारात आकस्मिक धनलाभ होईल. सामाजिक कार्यात सक्रिय सहभाग घ्याल. दिनमान उत्तम राहिल. आकस्मिक धनलाभ होईल.

कन्या – कुटुंबाकडून विशेष सहकार्य लाभेल. नोकरीत महत्वाची कार्य आज नक्की करा.अनुकूल यश मिळेल. व्यापारात आर्थिक लाभ होतील. शासकीय कामाच्या दृष्टीने अनुकुलता लाभेल. कोर्टाचा निकाल आपल्या लागेल. कौटुंबिक सुख व शांतीचे वातावरण लाभेल. कोणावरही अंधविश्वास बाळगु नका. भावनेच्या आधारावर कोणताही निर्णय घेऊ नका. दिनमान शुभ आहे. विचारपूर्वक गुंतवणूक करा. आर्थिक स्त्रोत वाढेल. कौटुंबिक सौख्य लाभेल. जोडीदाराकडून सहकार्य लाभेल.

तूळ – नोकरीत कामकाजात सुधारणा होईल. कायदेशीर बाबीकडे लक्ष दयावे लागणार आहे. ताणतणाव वाढणार नाही याची काळजी घ्या. नातेवाईकांच्या भेटीगाठी होतील. कुटुंबात मनमानी करू नका. विनाकारण वाद घालू नका. व्यापारात अचानक धनलाभाचे योग आहेत. व्यवहारात नम्रता व सहनशिलता ठेवा. मित्रमैत्रिणींची मदत मिळेल. अधिकारी लोकांशी नवीन संबंध जुळतील. कुटुबांतील सदस्याच्या आरोग्याबाबतीत विशेष लक्ष द्या. मानसिक स्वास्थ संभाळा.

वृश्चिक – नवीन प्रकल्प, कामे मिळतील. मनातील अहंकाराची भावना टाळावी. उत्तम दिवस आहे. आर्थिक लाभ होईल. नोकरीत काम यशस्वी होतील. महिलावर्गास प्रतिकारक दिनमान आहे. शैक्षणिक कार्यात लक्षणीय प्रगती होईल. कामानिमित्त घरापासून दुर जावे लागेल. जबाबदारीने कामे केल्यास भाग्याची साथ लाभेल. मित्रमैत्रिणी मध्ये स्नेह वाढेल. मन समाधानी राहिल. व्यापारात नफ्यात वाढ होणार आहे. कौटुंबिक सौख्य ही उत्तम लाभेल. दुर्व्यसनांपासून सावध रहा. प्रवास सुखकर होईल.

धनु – अविवाहितांना लग्नाचे प्रस्ताव येतील. नोकरीत जबाबदारी योग्य पद्धतीने पार पाडाल. आज कार्य वेळेवर पूर्ण होईल. प्रवासाचे योग प्रबळ आहे. प्रवासातून लाभ होणार आहे. परदेशगमनाची संधी मिळेल. प्रयत्नवादी राहाल. कामे यशस्वी होतील. व्यापारात आर्थिक लाभ चांगले होतील. कलाकारांना अनुकुलता लाभेल. मुलाची विद्याभासात प्रगती होईल. शैक्षणिक क्षेत्रातील व्यक्तींची प्रगती होईल.

मकर – उर्जावान दिनमान आहे. नोकरीत महत्वाची कामे मार्गी लागतील. केलेल्या कामाचा योग्य मोबदला पदरी पडेल. स्वतःच्या मनाने निर्णय घ्यावेत. पत्नीकडून सहकार्य लाभेल लागेल. महिला वर्गाकडून सहकार्य मिळेल. व्यापारात नवीन योजना आखाल. उत्तम अर्थप्राप्ती होईल. सामाजिक राजकीय कार्यातून लाभ होईल. आपल्या कार्यात मग्न राहा. सफलतापूर्वक दिनमान आहे. व्यापार-व्यवसायानिमित्त् दुरवरचे प्रवास होतील. प्रवासातून लाभ होईल. संशोधनात्मक कार्य घडतील. मानसन्मान मिळेल.

कुंभ – जुन्या व्याधी उद्भभवण्याची शक्यता आहे. स्वःतावर नियंत्रण ठेवा. नोकरीत विचारपूर्वक निर्णय घ्यावेत. वरिष्ठांबरोबर मतभेद होण्याची शक्यता आहे. शासकीय कामकाजाचे निर्णय आज घेवू नयेत. आज कर्ज घेणे टाळा.व्यापारात महत्वाचा व्यवहार करू नये. कर्जप्रकरण नामंजूर होण्याची शक्यता आहे. मित्रमैत्रिणींनी सोबत काळजीपूर्वक व्यवहार करावेत. अंहमपणा वाढीस लागेल. मानसिक संघर्ष निर्माण होईल. दुरवरचे प्रवास टाळावेत.वाहने सावकाश चालवा. अपघात भय संभवते.

मीन – शारिरिक त्रास होईल.नोकरीत सहकाऱ्यांची मदत मिळणार नाही. कामाच्या ठिकाणी वादविवादाचे प्रसंग घडतील. व्यापारात अडचणी त्रास आणि योजनेस विलंब होण्याची शक्यता आहे. मानसिक संतुलन ठेवा. कौटुंबिक पातळीवर कटुता निर्माण होईल. संततीविषयी चिंता निर्माण होईल. कुटुंबातील एखाद्या सदस्याला आरोग्याची गंभीर समस्या निर्माण होऊ शकते. स्वभावात अहंकारवृत्ती वाढेल. मानीपणा टाळा. रागावर नियंत्रण ठेवा. पत्नीच्या प्रकृतीकडे लक्ष द्यावे. आरोग्याबाबतीत आर्थिक खर्च वाढेल.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!