जाणून घ्या आज शनिवार दिनांक ११ फेब्रुवारी २०२३ रोजीचे आपले राशिभविष्य
मेष – आजचा दिवस आपल्यासाठी अत्यंत शुभ ठरणार आहे. मनोबल वाढेल. प्रवास सुखकर होईल. व्यापारात वाढ होईल. गुंतवणुकीसाठी दिवस चांगला आहे. नोकरीत समाधानी राहाल. कर्मचारी वर्गाचे चांगले सहकार्य लाभेल. शासकीय कामे मात्र पुढे ढकलावित. खरेदीसाठी दिनमान मंगलमय आहे. विवाहइच्छुकांचे विवाह जमतील. आरोग्य उत्तम राहील. गृहसौख्य, कौटुंबिक पातळीवर समाधानी असाल. कुटुंबातील वातावरण एकंदरीत आनंददायक राहील. संततीकडून समाधान लाभेल.
वृषभ – बेरोजगारांना रोजगार मिळेल. एखादी भाग्यकारक घटना घडेल. व्यापारात जोरदार आर्थिक प्रगती होईल. शेअर मार्केटमध्ये गुंतवणुकीसाठी उत्तम दिवस आहे. घर, वाहन खरेदीचा योग आहे. मुला-मुलीच्या संदर्भात एखादी चांगली घटना घडेल. आपलं व्यक्तिमत्व बहरून निघेल. मुलामुलींच्या संदर्भात चांगली घटना घडेल. तुमचे निर्णय योग्य आणि अचुक ठरतील. गृहसौख्यात वाढ होईल. पत्निकडून विशेष सहकार्य लागेल. प्रयत्नाच्या तुलनेत लाभ अधिक होईल. नोकरीत स्थान बदल होण्याची शक्यता आहे. नोकरीत प्रमोशन होईल.
मिथुन – व्यापारात प्रसिद्धी व आर्थिक लाभ मिळेल. नोकरीत आपण आपल्या जबाबदाऱ्या ओळखून त्या पूर्व कराल. आपलं व्यक्तीमत्व बहरून निघेल.आहारावर नियंत्रण ठेवणे गरजेच आहे.फाजिल आत्मविश्वासाचा अतिरेक करणे टाळा. कुटुंबातील वयोवृद्ध व्यक्तिची प्रकृती ढासण्याची शक्यता आहे. प्रेमसंबंधात भावनेवर नियंत्रण ठेवा. व्यापारात आर्थिक लाभाची सुखद संधी मिळेल. न्यायालयीन प्रकरण आज मिटतील. कौटुंबिक सौख्य समाधानकारक राहिल.सामजिक आणी सांस्कृतिक कार्यात आपला सहभाग राहिल.नोकरीत इच्छेनुसार बदली व बढती मिळेल.
कर्क – नोकरीत कामाचा ताण वाढेल. आळसाचा अतिरेक होईल. स्वभावात चिडचिडेपणा येईल. मनात नैराश्य व असमाधानी भावना निर्माण होऊ शकते. मानसिक क्लेश अस्वस्थता जाणवेल. व्यापारात जास्त मेहनत घ्यावी लागणार आहे. कौटुंबिक पातळीवर अनियोजित खर्च वाढेल. पत्नीच्या आरोग्याची चिंता निर्माण होऊ शकते. बोलण्यात गोडवा ठेवा. संयमी व शांत राहण्याचा प्रयत्न करा. आजचे दिनमान पिडादायक आहे. प्रवास नुकसानकारक राहील. प्रवासात दुर्घटनेची शक्यता आहे. दुरवरचे प्रवास टाळावेत. आरोग्याबाबतीत विशेष लक्ष दयावे.
सिंह – नोकरीत आपल्या मनाजोगे वातावरण निर्माण झाल्याने कामात उत्साह वाटेल. सहकाऱ्यांची उत्तम साथ मिळणार आहे. बढतीची संधी देखील मिळू शकते. व्यापारीवर्गातील व्यक्तिंना उत्तम धनप्राप्ती होईल. आत्मविश्वासाने परिपूर्ण दिवस राहील. उत्पन्नात सुधारणा होईल. कायदयाच्या नवीन संधी निर्माण होतील. पत्नीकडून नातेवाईकाकडून सहकार्य लाभेल. मन प्रसन्न राहील. नवीन योजना प्रकल्प यांचा विस्तार वाढ होईल. कायदेशीर बाबीची प्रक्रिया असेल तर निकाल आपल्या बाजूने लागेल. सामाजिक कार्यात भाग घ्याल.
कन्या – आपली कामे नियोजित वेळेत पूर्ण कराल. वरिष्ठांकडून कामाचे कौतुक होईल. विद्यार्थ्यांची विद्याभासात प्रगती राहील. संततीस यश प्राप्त होईल. नवीन नोकरीच्या मुलाखतीत यश येईल. शैक्षणिक कार्यासाठी परदेशी जाण्याची शक्यता आहे. अनेकांचे सहकार्य लाभेल. सार्वजनिक कामात प्रतिष्ठा प्राप्त होईल. जोडीदारांच्या मनाजोगे निर्णय घ्यावेत. कुटुंबातील वातावरण आनंदी राहील. स्पर्धापरीक्षेत यश संपादन कराल. कलाक्षेत्रातात कार्यरत असणाऱ्यांना उत्तम दिवस राहील. आरोग्य उत्तम राहील.
तुळ – आपण विचारपूर्वकचे निर्णय घ्या. बोलण्यातून गैरसमज वाढणार आहे. नोकरीच्या ठिकाणी अडचणीचा सामना करावा लागू शकतो. स्थानबदलाची शक्यता आहे. रागाचा अतिरेक टाळावा. मानसिक शांतता राखण्याचा प्रयत्न करा. मानसिक, शारिरिक आरोग्याबाबत अडचणी उद्भवू शकतात. पत्नीच्या तब्बेतीची चिंता निर्माण होऊ शकते. व्यापारात मोठी गुंतवणूक करू नये. राजकीय सामाजिक क्षेत्रातील व्यक्तीकरिता अनिष्ट दिवस आहे. शक्यतो दुरवरचे प्रवास टाळावेत. संतती व पत्नीच्या आरोग्याची काळजी घ्या. स्वभावात चिडचिडेपणा निर्माण होइल. मानसिक शांती राखण्याचा प्रयत्न करा.
वृश्चिक – संततीच्या बाबतीत चिंतीत राहाल. संततीच्या आरोग्याकडे लक्ष द्या. व्यापारात आर्थिक बाबतीत नुकसान होण्याची शक्यता आहे. जुनी येणी रखडतील. कर्ज प्रकरणे नामंजूर होतील. नवीन व्यापारास प्रारंभ करण्यासाठी अशुभ दिवस आहे. कौटुंबिक कलह होण्याची शक्यता आहे. मानसिक समस्यांचा सामना करावा लागेल. मोठ्या हानीची शक्यता आहे. मोठी शस्त्रक्रिया अपधात भय संभवते. कुटुंबात, समाजात आपल्या कामाची अवहेलना होईल. गुप्तशत्रुपासुन त्रास जाणवेल.
धनू – शासकीय कर्मचाऱ्यांना विशेष लाभ होतील. शासकीय कामकाजासाठी परदेशी प्रवासाची शक्यता आहे. नवीन योजना आमलात आणाल. व्यापारात नवीन प्रयोग कराल. त्यातून भरपुर आर्थिक फायदा होईल. नवीन योजना व इच्छित कामे मार्गी लागतील. मित्रमैत्रिणी कडून विशेष सहकार्य लाभेल. भौतिक सुखात वाढ होईल. कार्यात मन रमेल. गृहसौख्य ठिक राहील . आरोग्य, प्रकृती उत्तम राहिल.
मकर – मोठी जबाबदारी पदप्रतिष्ठा लाभणार आहे. शैक्षणिक व बौद्धिक कार्यात मानसन्मान मिळेल. धर्माप्रती आस्था निर्माण होईल. आध्यात्मिक सुखशांती अनुभवाल. सरकारी कामकाज मार्गी लागतील. शासकीय कामात लाभ होईल. राजाश्रय लाभणार आहे. नवीन योजना सफल होतील. परदेशी दौरा सफल होईल. स्वभावातील मरगळ मात्र टाळावी. व्यापारीवर्गासाठी आर्थिकदृष्या फायद्याचा दिवस आहे. कुटुंबातील वातावरण शांत, प्रसन्न व भक्तिमय राहिल. गुरुकृपा लाभणार आहे. घरातील अडचणी दूर होतील. पत्नी नोकरीत असेल तर प्रमोशन बढतीचे योग आहेत. आंनदायक वातावरण राहिल.
कुंभ – आपल्या प्रतिभेस वाव मिळेल. संशोधन, साहित्य, वैज्ञानिक क्षेत्रातील व्यक्तींकरिता प्रगतीकारक दिनमान आहे. आपला नावलौकिक वाढेल. प्रसिद्धी मिळेल. नोकरीच्या ठिकाणी मात्र वादविवाद, युक्तिवाद टाळावेत. कार्यात मग्न रहा आपल्या हातून उत्तम कार्य घडेल. प्रतिष्ठित व्यक्तींच्या गाठीभेठी होतील. त्यांच्याकडून सहकार्य लाभेल. व्यापारात धनवृद्धी होईल. कुटुंबात आनंदाचं वातावरण राहील. मनाजोग्या शुभफलदायी घटना आज घडणार आहेत. पतीपत्नीत स्नेह वाढेल. प्रेमप्रकरणात संबंध दृढ होतील.
मीन – नोकरीत वरिष्ठांकडून अती दबाव मानहानीला सामोरे जावे लागेल. खोटे आरोप,आळ येण्याची शक्यता आहे. कामात तणावपूर्ण वातावरण राहील. गोंधळ वाढेल. धरसोड वृत्ती टाळा. कुटुंबात कलह उत्पन होण्याची शक्यता आहे. पत्नीच्या प्रकृतीबाबत त्रास उदभवेल. आज शक्यतो प्रवास टाळा. वाहन सावकाश चालवा. अपघात भय संभवते. व्यापारात विचारपूर्वक निर्णय घ्या आर्थिक संकट निर्माण होऊ शकते. दिनमान अनिष्ट आहे. प्रकृतीच्या छोट्या तक्रारीकडे दुर्लक्ष करू नये, अन्यथा मोठ्या शारिरिक व्याधी निर्माण होतील. अशुभ अप्रिय वार्ता ऐकायला मिळतील.काळजी घ्या.
वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही